लेवीय 11:44-45 - Compare All Versions
लेवीय 11:44-45 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”
लेवीय 11:44-45 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका! मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!”
लेवीय 11:44-45 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.