YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 10:1-3 - Compare All Versions

लेवीय 10:1-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती; म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले. मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”

सामायिक करा
लेवीय 10 IRVMAR

लेवीय 10:1-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते. म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.

सामायिक करा
लेवीय 10 MRCV

लेवीय 10:1-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.

सामायिक करा
लेवीय 10 MARVBSI