यहोशवा 3:5-8
यहोशवा 3:5-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग यहोशवा लोकांस म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.” नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले. परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल. कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.”
यहोशवा 3:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.” यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले. मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे. कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ”
यहोशवा 3:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.” नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला.” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोश वाहणार्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा.”’