यहोशवा 23:1-3
यहोशवा 23:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराने इस्राएलला त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर बराच काळ लोटला, आणि यहोशवा वृद्ध झाला होता. तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरुष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरील कारभारी यांना बोलावून सांगितले, “मी फार वृद्ध झालो आहे. तुमच्यासाठी, या सर्व राष्ट्रांसोबत तुमचा देव परमेश्वर याने सर्वकाही कसे केले, हे सर्व तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण परमेश्वर देव, जो स्वतः केवळ तुमच्यासाठी लढला.
यहोशवा 23:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुष्कळ काळ होऊन गेला होता आणि याहवेहने इस्राएली लोकास सभोवतालच्या सर्व शत्रूपासून विश्रांती दिली, तोपर्यंत यहोशुआ अतिशय वयस्कर झाला होता, यहोशुआने सर्व इस्राएली लोकास, त्यांच्या वडीलजनास, पुढार्यांना, न्यायाधीशांना आणि अधिकार्यांना बोलाविले; आणि त्यांना म्हटले, “मी फार वृद्ध झालो आहे. याहवेह, तुमचे परमेश्वरांनी तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचे जे काही केले, ते सर्वकाही तुम्ही स्वतःच पाहिले आहे. ते याहवेहच तुमचे परमेश्वर होते जे तुमच्यासाठी लढले.
यहोशवा 23:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला; आणि यहोशवा वृद्ध व वयातीत झाला; तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएलांना म्हणजे त्यांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अंमलदार ह्यांना बोलावून म्हटले, “मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे; तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या सर्व राष्ट्रांचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वत: तुमच्यासाठी लढला.