YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 14:10-13 - Compare All Versions

यहोशवा 14:10-13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तर आता पाहा इस्राएल रानात चालत असता, परमेश्वराने ही गोष्ट मोशेला सांगितली, तसे त्याने मला या पंचेचाळीस वर्षात जिवंत ठेवले आहे; आणि आता पाहा, मी आज पंचाऐंशी वर्षांचा आहे. जेव्हा मोशेने मला पाठवले होते, तेव्हाच्या दिवसाप्रमाणे मी आजही सामर्थ्यवान आहे. लढाई करण्याचे व ये जा करण्याचे सामर्थ्य माझ्यात जसे तेव्हा होते तितकेच आजही आहे. तर परमेश्वराने त्यादिवशी ज्या डोंगराळ प्रदेशाविषयी सांगितले, तो हा आता मला दे; कारण त्यादिवशी तू ऐकले होते की, तेथे अनाकी लोक आणि मोठी तटबंदीची नगरे आहेत; तरी परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना वतनातून बाहेर घालवीन.” तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले

सामायिक करा
यहोशवा 14 IRVMAR

यहोशवा 14:10-13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे! मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे. म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.” तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले.

सामायिक करा
यहोशवा 14 MRCV

यहोशवा 14:10-13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

इस्राएल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ, मी पंचाऐंशी वर्षांचा आहे. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे; लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.” मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले

सामायिक करा
यहोशवा 14 MARVBSI