YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 13:1-6

यहोशवा 13:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता यहोशवा म्हातारा आणि चांगल्या उतारवयाचा झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याच्याशी म्हणाला, “तू म्हातारा झाला आहेस आणि तुझे वय पुष्कळ झाले आहे, परंतु अजून पुष्कळ देश काबीज करून घ्यावयाचा राहिला आहे.” हा देश अजून बाकी राहिला आहे: पलिष्ट्यांचा सर्व प्रांत, आणि सर्व गशूरी प्रांत; मिसराच्या पूर्वेस जी शीहोर नदी तिजपासून उत्तरेस जे एक्रोन त्याच्या सीमेपर्यंत ही जो देश, तो कनान्यांचा मानलेला आहे; गज्जी व अश्दोदी, अष्कलोन, गथी व एक्रोनी व अव्वी यांचे पलिष्टी पाच सुभेदार आहेत. दक्षिणेस कनान्यांचा सर्व देश, आणि सीदोन्याचे मारा, अफेक व अमोऱ्यांच्या सीमेपर्यंतचा देश; आणि गिबली यांचा देश, व सूर्याच्या उगवतीस सर्व लबानोन, हर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथात जायच्या ठिकाणापर्यंत तो देश घ्यायचा आहे; लबानोनापासून मिस्रफोथ माइमापर्यंत डोंगराचे सर्व राहणारे, सर्व सीदोनी, यांस मी इस्राएलाच्या संतानापुढून वतनातून बाहेर घालवीन; त्यांचा देश इस्राएलाचे वतन होण्यास मी तुला आज्ञा दिल्याप्रमाणे चिठ्ठ्या टाकून वाटून दे.

सामायिक करा
यहोशवा 13 वाचा

यहोशवा 13:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा यहोशुआ उतार वयाचा झाला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “तू आता खूप वयस्कर झाला आहेस आणि देशाचा बराच भाग ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे.” जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश; पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश: दक्षिणेकडे कनानी लोकांचा सर्व प्रदेश; सीदोनी लोकांचा माराह, अफेक आणि अमोर्‍यांची सीमा इथपर्यंत आहे; गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन. “लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर.

सामायिक करा
यहोशवा 13 वाचा

यहोशवा 13:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता; तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा राहिला आहे. बाकी राहिलेला देश हा : पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश, (मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन); ह्यांखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफेक व अमोर्‍यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सीदोन्यांचा मारा नावाचा देश; आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल-गादापासून हमाथाच्या खिंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन. लबानोनापासून मिस्रपोथ-माईमापर्यंतच्या डोंगराळ प्रदेशातील सीदोनाच्या रहिवाशांना मी इस्राएल लोकांपुढून घालवून देईन; तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्राएल लोकांना वाटून दे.

सामायिक करा
यहोशवा 13 वाचा