यहोशवा 1:3-9
यहोशवा 1:3-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही. बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
यहोशवा 1:3-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन. तुमची सीमा वाळवंटापासून लबानोन पर्यंत आणि महान नदी फरातपासून, सर्व हिथी देश, ते पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत असेल. तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही. खंबीर हो आणि हिंमत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना वारसा म्हणून देण्याची मी शपथ वाहिली त्या देशात नेण्यासाठी तू त्यांचे नेतृत्व करशील. “मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील. शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”
यहोशवा 1:3-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हांला दिले आहे. रान व हा लबानोन ह्यांपासून महानद फरातपर्यंतचा हित्ती ह्यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”