यहोशवा 1:1-2
यहोशवा 1:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला, “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.
यहोशवा 1:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले: “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे.
यहोशवा 1:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, “माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा.