योना 4:6-7
योना 4:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगविली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली.
सामायिक करा
योना 4 वाचायोना 4:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला. पण दुसर्या दिवशी पहाटे परमेश्वराने एक कीटक पाठविला, ज्याने रोपटे कुरतडले आणि त्यामुळे रोपटे सुकले.
सामायिक करा
योना 4 वाचायोना 4:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगववला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. ह्या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला. पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला; तो त्या तुंबीला लागला, तेव्हा ती सुकून गेली.
सामायिक करा
योना 4 वाचा