योना 2:5-7
योना 2:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली.
योना 2:5-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बुडविणार्या पाण्याने मला घाबरविले, माझ्या सभोवताली खोल डोह होता; माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते. मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला. “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.
योना 2:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले. मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस. माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली.