YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योएल 2:23-27 - Compare All Versions

योएल 2:23-27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील. मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन. मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. आणि तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल. आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, आणि दुसरा कोणीच नाही. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.

सामायिक करा
योएल 2 IRVMAR

योएल 2:23-27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सीयोनच्या लोकांनो, आनंद करा; तुमच्या याहवेहच्या ठायी आनंद करा, कारण त्यांनी शरदॠतूतील पाऊस दिला आहे कारण ते विश्वासयोग्य आहेत. परमेश्वर तुमच्यासाठी विपुल वृष्टी करतात, शरदॠतूतील आणि वसंतॠतूतील भरपूर पाऊस पाहिल्याप्रमाणे दिला आहे. खळी पुन्हा गव्हाच्या उंच राशींनी भरून जातील; आणि कुंडे तेलाने आणि द्राक्षारसाने ओसंडून वाहू लागतील. “मोठे टोळ व तरुण टोळ इतर टोळ व टोळांचे थवे, म्हणजेच माझे मोठे सैन्य जे मी तुमच्यामध्ये पाठवले होते; त्यांनी खाल्लेल्या तुमच्या वर्षांची मी भरपाई करेन. जोपर्यंत तुम्ही तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही खाल, ज्यांनी तुमच्यासाठी अद्भुत कार्य केले आहेत त्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या नावाची तुम्ही स्तुती कराल, माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत. तुम्हाला कळून येईल की मी इस्राएलमध्ये आहे, आणि मीच याहवेह तुमचा परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही; माझे लोक पुन्हा कधीही लज्जित होणार नाहीत.

सामायिक करा
योएल 2 MRCV

योएल 2:23-27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

सीयोनपुत्रहो, परमेश्वर तुमचा देव ह्याच्या ठायी उल्लास करा, हर्ष करा; कारण तुम्हांला हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस1 तो देतो; तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील. मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्‍चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.

सामायिक करा
योएल 2 MARVBSI