ईयोब 42:10-12
ईयोब 42:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्यास पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले. ईयोबाचे सगळे भाऊ आणि बहिणी त्याच्या घरी आले. ईयोबाला जो कोणी ओळखत होता तो ही त्याच्याकडे आला. त्यांनी ईयोबासह भोजन घेतले. त्यांनी ईयोबाचे सांत्वन केले. परमेश्वराने ईयोबावर इतकी संकटे आणली त्याचे त्यांना वाईट वाटले. प्रत्येकाने ईयोबाला चांदीचा तुकडा आणि सोन्याची अंगठी दिली. परमेश्वराने ईयोबाच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक कृपा केली. ईयोबाकडे आता चौदा हजार मेंढ्या, सहा हजार उंट, दोन हजार गायी आणि एक हजार गाढवी आहेत.
ईयोब 42:10-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इय्योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केल्यानंतर, याहवेहने त्याची मालमत्ता पुनर्स्थापित केली आणि त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट त्याला परत दिले त्याचे सर्व भाऊ, बहिणी व ते सर्वजण जे त्याला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याच्या घरी येऊन त्याच्याबरोबर भोजन केले. त्यांनी त्याचे सांत्वन केले आणि याहवेहने त्याच्यावर आणलेल्या प्रत्येक संकटाविषयी सहानुभूती दाखविली, आणि प्रत्येकाने त्याला चांदीचे नाणे व सोन्याची अंगठी दिली. याहवेहने इय्योबाच्या जीवनाच्या सुरवातीच्या दिवसांपेक्षा त्याच्या उतार वयात त्याला अधिक आशीर्वादित केले. त्याच्याजवळ चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या व हजार गाढवे होती.
ईयोब 42:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले; आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले; प्रत्येकाने त्याला एक कसीटा1 व एक सोन्याची अंगठी दिली. परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.