ईयोब 38:39-41
ईयोब 38:39-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का? ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात. कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?
सामायिक करा
ईयोब 38 वाचाईयोब 38:39-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का? ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात? कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?
सामायिक करा
ईयोब 38 वाचा