YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 7:45-53

योहान 7:45-53 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?” कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय? अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला. “एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.” मग ते सर्वजण आपआपल्या घरी गेले.

सामायिक करा
योहान 7 वाचा

योहान 7:45-53 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

शेवटी मंदिराचे शिपाई महायाजक व परूशी यांच्याकडे परत आले. त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?” शिपाई उत्तर देत म्हणाले, “या मनुष्यासारखे आतापर्यंत कोणीही बोलले नाही.” त्यावर उलट उत्तर देत परूशी म्हणाले, “तुम्हालाही त्याने फसविले आहे काय?” अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? नाही! परंतु हा समुदाय ज्यांना नियमशास्त्राविषयी माहिती नाही—तो शापित आहे. निकदेम, हा त्यांच्यापैकी एक असून, जो पूर्वी येशूंकडे गेला होता, म्हणाला, “एखाद्याचे प्रथम न ऐकता व जे कार्य तो करत आहे ते समजून न घेता नियमशास्त्र त्याला दोषी ठरविते काय?” त्यावर त्यांनी उत्तर दिले, “तुम्हीदेखील गालीलकर आहात काय? शोधून पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही.” नंतर ते सर्वजण घरी गेले.

सामायिक करा
योहान 7 वाचा

योहान 7:45-53 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग मुख्य याजक व परूशी ह्यांच्याकडे कामदार आले; त्यांना ते म्हणाले, “तुम्ही त्याला का आणले नाही?” कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” त्यावरून परूशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहात काय? अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला, “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.” [मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले.

सामायिक करा
योहान 7 वाचा

योहान 7:45-53 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडे अधिकारी परत आले. त्यांनी त्यांना विचारले, “तुम्ही त्याला का आणले नाही?” अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” त्यावरून परुशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसलात का? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे का? परंतु हा लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही म्हणून तो शापग्रस्त आहे.” येशूकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता. तो त्यांना म्हणाला, “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व त्याने काय केले आहे, ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलमधले आहात काय? धर्मशास्त्राचा अभ्यास करून पाहा म्हणजे गालीलमधून कोणी संदेष्टा उदयास येणार नाही, हे तुम्हांला कळेल.” [त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले.

सामायिक करा
योहान 7 वाचा