YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:25-26 - Compare All Versions

योहान 4:25-26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.” येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.”

सामायिक करा
योहान 4 MARVBSI

योहान 4:25-26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ती स्त्री त्यास म्हणाली, “मी जाणते की, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला माहित आहे. तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी सांगेल.” येशू तिला म्हणाला, “तुझ्याशी बोलणारा मीच तो आहे.”

सामायिक करा
योहान 4 IRVMAR

योहान 4:25-26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ती स्त्री त्याला म्हणाली, “ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो मसिहा येणार आहे आणि तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल, हे मला ठाऊक आहे.” येशू तिला म्हणाला, “तुझ्याबरोबर बोलणारा मी, तो आहे.”

सामायिक करा
योहान 4 MACLBSI

योहान 4:25-26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.” यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.”

सामायिक करा
योहान 4 MRCV