योहान 4:16-24
योहान 4:16-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू तिला म्हणाला, “जा, तुझ्या पतीला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तू ठीक बोललीस की, ‘तुला पती नाही;’ कारण तुला पाच पती होते आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा पती नाही, हे तू खरे बोललीस.” ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे.” येशू तिला म्हणाला, “मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही, तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
योहान 4:16-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.” परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.” “महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते. आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.” येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही. तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे. अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे. परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”
योहान 4:16-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्याला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
योहान 4:16-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो तिला म्हणाला, “तू जाऊन तुझ्या पतीला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “‘मला पती नाही’, हे तू खरे बोललीस, तुला पाच पती होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो खरोखर तुझा पती नाही, हे तू खरे सांगितलेस!” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टा आहात, हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे, ते स्थान यरुशलेम येथे आहे.” येशू तिला म्हणाला, “बाई, अशी वेळ येत आहे की, पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेममध्येही करणार नाहीत, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता परंतु आम्हांला ठाऊक आहे, अशाची उपासना आम्ही करतो; कारण तारण यहुदी लोकांमधूनच आहे. मात्र खरे उपासक आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण अशा उपासकांनी त्याची उपासना करावी, हे त्याला अभिप्रेत आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व सत्याने केली पाहिजे.”