योहान 2:19-22
योहान 2:19-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.” यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?” तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
योहान 2:19-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू म्हणाले, “हे मंदिर तुम्ही नष्ट करा आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.” त्यांनी उत्तर दिले, “हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली आणि आपण तीन दिवसात हे बांधू शकता का?” परंतु मंदिर म्हणजे स्वतःच्या शरीरा संदर्भात ते बोलत होते. पुढे ते मरणातून उठल्यानंतर, त्यांच्या शिष्यांना या शब्दाचे स्मरण झाले. नंतर त्यांनी शास्त्रलेख व येशूंनी उच्चारलेली वचने यावर विश्वास ठेवला.
योहान 2:19-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.” ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?” तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला.
योहान 2:19-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभारीन.” ह्यावरून यहुदी म्हणाले, “हे मंदिर बांधायला सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?” तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता. त्याने असे म्हटले होते, हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी धर्मशास्त्रावर व येशूच्या वचनावर विश्वास ठेवला.