योहान 2:1-5
योहान 2:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर तिसर्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.” येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”
योहान 2:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तिसर्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते. येशूंची आई तिथे होती, येशू व त्यांच्या शिष्यांना देखील त्या लग्नाचे आमंत्रण होते. ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, “त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे.” येशू म्हणाले, “बाई, तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही.” त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, “हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”
योहान 2:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर तिसर्या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”
योहान 2:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तिसऱ्या दिवशी गालीलमधील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. तेथे द्राक्षारस संपला असता येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई नोकरांना म्हणाली, “तो तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”