योहान 16:5-16
योहान 16:5-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही. पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे. तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन; आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करील. पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. नीतिमत्त्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही. आणि न्यायाविषयी; कारण या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे. मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही. पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील. जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हास कळवील. थोड्या वेळाने, मी तुम्हास दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
योहान 16:5-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कुठे जाता?’ असे विचारीत नाही खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत. परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन. जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल. पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत; नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही; न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे. “मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही. परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल. कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल. पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.” येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.”
योहान 16:5-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि ‘आपण कोठे जाता?’ असे तुमच्यापैकी कोणी मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय-निवाड्याविषयी जगाची खातरी करील : ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी; मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही ह्यावरून नीतिमत्त्वाविषयी; आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी, मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही; आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. [कारण मी पित्याकडे जातो.]”
योहान 16:5-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु ज्याने मला तुमच्याकडे पाठवले त्याच्याकडे आता मी जात आहे. तरीही आपण कुठे जाता, असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने जड झाले आहे. तरीही मी तुम्हांला खरे ते सांगतो. मी जावे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. परंतु मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी पटवील. पापाविषयी, कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत; नीतिमत्वाविषयी, कारण मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हांला मी दिसणार नाही आणि न्यायनिवाड्याविषयी, कारण ह्या जगाच्या सत्ताधीशाचा न्याय झाला आहे. मला अजून तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत, तरी पण सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्याविषयी मार्गदर्शन करील. तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही तो ऐकेल, तेच सांगेल आणि पुढे येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, कारण जे माझे आहे तेच तो तुम्हांला सांगेल. जे काही पित्याचे आहे, ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हटले, जे माझे आहे, तेच तो तुम्हांला सांगेल. थोडा वेळ मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”