YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 15:5-8

योहान 15:5-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही. जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात. परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल. तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.

सामायिक करा
योहान 15 वाचा

योहान 15:5-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.

सामायिक करा
योहान 15 वाचा

योहान 15:5-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हांला काही करता येणार नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर वेलीपासून छाटलेल्या फाट्याप्रमाणे तो वाळून जातो; असे वाळलेले फाटे एकत्र करून अग्नीत टाकले जातात व तेथे ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुमच्यामध्ये राहिलीत, तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा; ते तुमच्यासाठी केले जाईल. तुम्ही विपुल फळ दिले तर माझ्या पित्याचा गौरव होईल. अशा प्रकारे तुम्ही माझे शिष्य व्हाल.

सामायिक करा
योहान 15 वाचा

योहान 15:5-8

योहान 15:5-8 MARVBSIयोहान 15:5-8 MARVBSIयोहान 15:5-8 MARVBSIयोहान 15:5-8 MARVBSIयोहान 15:5-8 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा