YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:32-39

योहान 11:32-39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता.” जेव्हा, येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूदी लोकांस रडतांना पाहून तो आत्म्यात कळवळला व अस्वस्थ झाला; आणि म्हणाला, “तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?” ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला. यावरुन यहूदी लोक म्हणाले, “पाहा, याची त्याच्यावर कितीतरी प्रीती होती!” परंतु त्यांच्यांतील कित्येक म्हणाले, “ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्यास, हा मरू नये असे सुद्धा करता आले नसते काय?” येशू पुन्हा अंतःकरणात खवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती व तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:32-39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू जिथे होते तिथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.” येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकूळ व अस्वस्थ झाले. येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, या आणि पाहा.” येशू रडले. नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!” परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाहीत का?” येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:32-39 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला. ह्यावरून यहूदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!” परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय?” येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:32-39 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू होता तेथे मरिया गेली आणि त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभो, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ आम्हांला सोडून गेला नसता.” येशूने तिला व तिच्याबरोबर आलेल्या लोकांना रडताना पाहिले तेव्हा तो आत्म्यात कळवळला व व्याकूळ होऊन म्हणाला, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभो, येऊन पाहा.” येशू रडला. हे पाहून लोक म्हणाले, “पाहा, ह्याची त्याच्यावर किती प्रीती होती!” परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळता आले नसते काय?” येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती. येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.”

सामायिक करा
योहान 11 वाचा