यिर्मया 9:1-2
यिर्मया 9:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते. जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.
यिर्मया 9:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता. बरे झाले असते, जर ओसाड रानात माझ्याकडे या यात्रेकरूंकरिता एखादे आश्रयस्थान असते. जेणेकरून मी माझ्या लोकांचा त्याग करून त्यांच्यापासून दूर गेलो असतो; कारण ते सर्वजण व्यभिचारी आहेत, विश्वासघातकी लोकांचा एक जमाव.
यिर्मया 9:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता. मला वनात वाटसरूंसारखे बिर्हाड असते तर किती बरे होते? म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो; कारण ते सर्व व्यभिचारी, बेइमान्यांचा जमाव आहेत.