YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 4:3-4 - Compare All Versions

यिर्मया 4:3-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण परमेश्वर यहूदा व यरूशलेम मधील प्रत्येक व्यक्तीला म्हणतो: “तुम्ही आपली जमीन नांगरा, काट्यांमध्ये बी पेरु नका. अहो यहूदातील मनुष्यांनो आणि यरूशलेममधील रहिवास्यांनो, परमेश्वरासाठी तुम्ही आपली सुंता करा व आपले हृदय परमेश्वराला समर्पण करा. नाही तर तुमच्यातील कोणालाही विझवता न येणारा माझा क्रोधाचा अग्नी बाहेर पडून तुम्हास जाळून टाकील. हे असे घडण्याचे कारण तुम्ही केलेल्या दुष्कृत्ये आहेत.”

सामायिक करा
यिर्मया 4 IRVMAR

यिर्मया 4:3-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात: “तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या, काट्यांमध्ये बीजारोपण करू नका. अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो याहवेहसाठी तुमची सुंता करा, तुमच्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर माझा राग भडकेल व अग्नीसारखा भडकेल कारण तुम्ही पापे केली आहेत— तो क्रोधाग्नी कोणालाच विझविता येणार नाही.”

सामायिक करा
यिर्मया 4 MRCV

यिर्मया 4:3-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

कारण परमेश्वर यहूदा व यरुशलेम ह्यांतल्या लोकांना म्हणतो, “आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”

सामायिक करा
यिर्मया 4 MARVBSI