YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 30:17-22

यिर्मया 30:17-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही. परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन. मग नगर नाशाच्या ढिगाऱ्यावर बांधण्यात येईल आणि ज्याठिकाणी किल्ले होते त्याच जागी पुन्हा होतील. नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल, कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत. मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल. कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे? हे परमेश्वराचे निवेदन आहे. मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”

सामायिक करा
यिर्मया 30 वाचा

यिर्मया 30:17-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन आणि तुझ्या जखमा बर्‍या करेन,’ याहवेह जाहीर करतात, ‘कारण तू बहिष्कृत म्हणविली जात होती, सीयोन नगरी, जिची कोणासही चिंता नाही.’ “परंतु याहवेह असे म्हणतात: “ ‘मी तुझी धनसंपत्ती तुला परत देईन, आणि याकोबाच्या निवासावर करुणा करेन; त्याच्या भग्नावशेषांवरही नगरी पुन्हा बांधली जाईल आणि राजवाडा पुन्हा त्याच्या ठराविक जागी उभारला जाईल. तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील आणि आनंदगीतांचे ध्वनी येतील. मी त्यांची लोकसंख्या वाढवेन, पण त्यात घट होऊ देणार नाही; मी त्यांना प्रतिष्ठित करेन, पण ते तुच्छ मानले जाणार नाहीत. त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; त्यांचा छळ करणार्‍या सर्वांना मी शिक्षा करेन. त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल; त्यांचा शासनकर्ता त्यांच्यामधून उभारल्या जाईल. मी त्याला माझ्या निकट आणेन आणि तो माझ्या निकट येईल, कारण माझ्या निकट येण्यासाठी त्याने स्वतःस मला समर्पित केले पाहिजे ना?’ असे याहवेह जाहीर करतात. ‘तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा परमेश्वर होईन.’ ”

सामायिक करा
यिर्मया 30 वाचा

यिर्मया 30:17-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’ परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्‍यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल. त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत. त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील, त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांना मी शासन करीन. त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्यासन्निध येईल, कारण माझ्यासन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.”

सामायिक करा
यिर्मया 30 वाचा