YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 3:14-15 - Compare All Versions

यिर्मया 3:14-15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन. माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.

सामायिक करा
यिर्मया 3 IRVMAR

यिर्मया 3:14-15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“विश्वासहीन लोकांनो, परत या,” याहवेह म्हणतात, “कारण मी तुमचा धनी आहे. मी तुमची निवड करेन—एका नगरातून एक आणि एका कुळातून दोन—आणि तुला सीयोनास आणेन. नंतर मी तुम्हाला माझ्या मनासारखा असा मेंढपाळ देईन, तो शहाणपणाने आणि समजूतदारपणाने तुम्हाला मार्गदर्शन करेल.

सामायिक करा
यिर्मया 3 MRCV

यिर्मया 3:14-15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन. मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांला ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करतील.

सामायिक करा
यिर्मया 3 MARVBSI