YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 14:7-11

यिर्मया 14:7-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर. कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे. इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले. तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा? जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस? कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हास सोडून जाऊ नकोस.” परमेश्वर या लोकांस असे म्हणतो: त्यांना भटकने प्रिय झाले आहे, त्यांनी आपले पाय असे करण्या पासून आवरून धरले नाही. यास्तव परमेश्वर त्यांच्यापासून आनंदी नाही, आता तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील. परमेश्वर मला म्हणाला, “या लोकांच्या भल्यासाठी तू प्रार्थना करु नकोस.

सामायिक करा
यिर्मया 14 वाचा

यिर्मया 14:7-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे! तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात? एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या तारण ने करणाऱ्या वीरासारखे का झालात? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका! यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले: “माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते; ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत. म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत; आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.” मग याहवेहने मला म्हटले, “त्यांच्या भल्यासाठी इतःपर प्रार्थना करू नकोस.

सामायिक करा
यिर्मया 14 वाचा

यिर्मया 14:7-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर; आमचे कितीदा पतन झाले आहे! तुझ्याविरुद्ध आम्ही पाप केले आहे. हे इस्राएलाच्या आशाकंदा, संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या, देशातल्या उपर्‍यासारखा, रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास? स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा, वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास? तरी हे परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस, तुझे नाम आम्हांला दिलेले आहे; आमचा त्याग करू नकोस.” परमेश्वर ह्या लोकांना असे म्हणतो, त्यांना अशा प्रकारे भटकणे आवडले, त्यांनी आपले पाय आवरले नाहीत; म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही; तो आता त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल. परमेश्वर मला म्हणाला, “ह्या लोकांसाठी, त्यांच्या बर्‍यासाठी, प्रार्थना करू नकोस.

सामायिक करा
यिर्मया 14 वाचा