यिर्मया 1:6-9
यिर्मया 1:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.” पण परमेश्वर मला म्हणाला, “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.” मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत.
यिर्मया 1:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.” परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल. त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे,” याहवेह असे जाहीर करीत आहेत. तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे.
यिर्मया 1:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत