शास्ते 3:20-22
शास्ते 3:20-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. “एहूद म्हणाला,” “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे,” तेव्हा तो आसनावरून उठला. मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली; पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती.
शास्ते 3:20-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग त्याच्या राजवाड्याच्या वरच्या खोलीत तो एकटाच बसला असताना एहूद त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “तुमच्यासाठी माझ्याकडे परमेश्वराचा संदेश आहे.” राजा आसनावरून उठताच, एहूदाने आपला डावा हात पुढे झग्याखाली करून उजव्या मांडीवर बांधलेली तलवार उपसली आणि राजाच्या पोटात खोल खुपसली. पात्याबरोबर मूठही आत गेली आणि आतडी बाहेर पडली, एहूदाने ती तलवार बाहेर काढली नाही, तलवारीवर चरबी गोळा झाली होती.
शास्ते 3:20-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे.” तेव्हा तो आसनावरून उठला. मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार उपसून त्याच्या पोटात खुपसली; पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती.