YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 2:6-13

शास्ते 2:6-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा यहोशवाने लोकांस निरोप देऊन पाठवून दिले तेव्हा इस्राएलाचे लोक देश आपल्या मालकीचा करून घ्यायला प्रत्येकजण आपल्या वतनास गेले. यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कामे पाहिली होती त्यांच्या सर्व दिवसात लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्यास पुरले. ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती. इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले; आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल आणि अष्टारोथ यांची उपासना केली

सामायिक करा
शास्ते 2 वाचा

शास्ते 2:6-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर यहोशुआने इस्राएली लोकांना निरोप दिला, ते देशाचा ताबा घेण्यास गेले, आपापल्या वतनावर गेले. लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेली महान कृत्ये ज्यांनी पाहिली त्यांनी याहवेहची सेवा केली. नूनाचा पुत्र यहोशुआ, याहवेहचा सेवक, वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. आणि गाश पर्वताच्या उत्तरेस एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या प्रदेशात त्यांनी त्याचे दफन केले. नंतर ती संपूर्ण पिढी त्यांच्या पूर्वजांना मिळाल्यानंतर, दुसरी पिढी उदयास आली, ज्यांना याहवेहबद्धल किंवा त्यांनी इस्राएलसाठी काय केले हे माहीत नव्हते. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली. त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली.

सामायिक करा
शास्ते 2 वाचा

शास्ते 2:6-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यहोशवाने इस्राएल लोकांना निरोप दिला तेव्हा ते देशाचा ताबा घेण्यासाठी आपापल्या वतनावर गेले. यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली. ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेणेकरून त्यांनी परमेश्वराला चीड आणली. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली

सामायिक करा
शास्ते 2 वाचा