YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 14:16-17 - Compare All Versions

शास्ते 14:16-17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर शमशोनाची बायको त्याच्यापुढे रडत म्हणू लागली, “तुमचे माझ्यावर प्रेम नाही; तुम्ही माझा केवळ द्वेष करता. माझ्यावर प्रीती करत नाही. माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले, पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही.” तो तिला म्हणाला, “हे पाहा, मी ते माझ्या आईवडिलांनाही सांगितले नाही, तर ते काय तुला सांगू?” मेजवानीच्या सातव्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने सातव्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले.

सामायिक करा
शास्ते 14 MARVBSI

शास्ते 14:16-17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यासमोर रडून म्हणू लागली, “तुम्ही केवळ माझा द्वेष करता! माझ्यावर प्रीती करतच नाही. तुम्ही माझ्या लोकांस तर कोडे सांगितले आहे, परंतु त्याचे उत्तर मला सांगितले नाही.” परंतु शमशोन तिला म्हणाला, “पहा, मी आपल्या आईबापाला ते सांगितले नाही, तर तुला कसे सांगू?” मेजवानीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.

सामायिक करा
शास्ते 14 IRVMAR

शास्ते 14:16-17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा शमशोनाची पत्नी त्याच्यापुढे अश्रू गाळीत म्हणाली, “तुम्ही माझा द्वेष करता! तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नाही. कारण तुम्ही माझ्या लोकांना कोडे घातले आहे, परंतु तुम्ही मला उत्तर दिले नाही.” तो तिला म्हणाला, “मी माझ्या वडिलांना किंवा आईला देखील कोड्याचे उत्तर सांगितलेले नाही, तर मग मी तुला ते का सांगावे?” मेजवानीचे संपूर्ण सात दिवस ती रडली. त्यामुळे सातव्या दिवशी शेवटी त्याने तिला सांगितले, कारण ती त्याच्यावर फार दबाव टाकत होती. तिने जाऊन आपल्या लोकांना कोडे समजावून सांगितले.

सामायिक करा
शास्ते 14 MRCV