YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 10:6-8

शास्ते 10:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर इस्राएलाच्या लोकांनी फिरून देवाच्या दृष्टीने जे वाईट ते केले; कारण की त्यांनी बआल, अष्टारोथ, अरामाचे देव, सीदोनातले देव, मवाबातले देव व अम्मोनी लोकांचे देव व पलिष्ट्यांचे देव, यांची उपासना केली; त्यांनी परमेश्वरास सोडले, आणि त्यानंतर त्याची उपासना केलीच नाही. यास्तव परमेश्वराचा राग इस्राएलावर भडकला, आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या हाती व अम्मोनी लोकांच्या हाती दिले. त्या वर्षी, त्यानंतर अठरा वर्षे त्यांनी इस्राएलाच्या सर्व लोकांस छळले आणि यार्देनेच्या पलीकडे अमोऱ्यांच्या देशातल्या गिलादात जे इस्राएली होते त्या सर्वांना जाचले.

सामायिक करा
शास्ते 10 वाचा

शास्ते 10:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले. यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले. ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला.

सामायिक करा
शास्ते 10 वाचा