शास्ते 10:1-5
शास्ते 10:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अबीमलेखाच्या मृत्यूनंतर इस्राएलाच्या सुटकेसाठी दोदोचा पुत्र पुवा याचा पुत्र तोला, जो इस्साखारातला मनुष्य तो उभा झाला, आणि तो एफ्राइम डोंगराळ प्रदेशात शामीर शहरात राहत होता. त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला, मग तो मेला आणि शामीर नगरात पुरला गेला. नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला. त्यास तीस पुत्र होते; प्रत्येकाचे आपापले गाढव होते ज्यावर ते सवार होत होते; आणि त्यास तीस नगरेही होती; आजपर्यंत त्यास हावोथ याईर म्हणतात; ती गिलादाच्या प्रांतात आहेत. मग याईर मरण पावल्यावर त्यास कामोन शहरात पुरले.
शास्ते 10:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे. तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर म्हणून संबोधली जातात. याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.
शास्ते 10:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अबीमलेखानंतर इस्राएलाचे संरक्षण करायला इस्साखार वंशातील तोला बिन पुवा बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे. त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला; नंतर तो मृत्यू पावला; त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात. याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. अम्मोन्यांच्या हातून इस्राएल लोकांचा छळ