याकोब 4:14-17
याकोब 4:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.” आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे. म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.
याकोब 4:14-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.” जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे. जर कोणाला चांगले करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप गणले जाते.
याकोब 4:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू,” असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून फुशारकी मारता; अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.
याकोब 4:14-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. उलट तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूची इच्छा असेल, तर आपण जगू व अमुक-अमुक करू’. परंतु आता तुम्ही उर्मटपणाने फुशारकी मारता आणि अशी फुशारकी दुष्ट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही, तो पाप करतो.