याकोब 4:1-2
याकोब 4:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय? तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.
याकोब 4:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय? तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही.
याकोब 4:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हांला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता व लढता; तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हांला प्राप्त होत नाही.
याकोब 4:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यामध्ये भांडणतंटे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही? तुम्ही इच्छा धरता, तरी तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तेव्हा तुम्ही घात करायला तयार होता. हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही म्हणून तुम्ही भांडणतंटे करता. तुम्ही देवाकडे मागत नाही, म्हणून तुम्हांला मिळत नाही