याकोब 2:8-9
याकोब 2:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
याकोब 2:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता. पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता.
याकोब 2:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.
याकोब 2:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही बाह्यरूप पाहून वागत असाल तर पाप करता आणि उ्रंघन करणारे म्हणून नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता.