याकोब 2:20-24
याकोब 2:20-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय? आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय? आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का? ‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व गणण्यात आले’, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले. तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.
याकोब 2:20-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे का? आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का? तुम्हीच पाहा, त्याचा विश्वास आणि कृती एकत्रित कार्य करत होते आणि त्याने जे काही केले त्याद्वारे त्याचा विश्वास पूर्ण झाला. आणि जे शास्त्रलेखात सांगितले ते पूर्ण झाले, “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले,” आणि त्याला परमेश्वराचा मित्र म्हणण्यात आले. तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो.
याकोब 2:20-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय? आपला बाप ‘अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पण केले’ ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते. “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता.
याकोब 2:20-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अरे बुद्धिहीन मनुष्या, कृतीवाचून विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावून द्यावयास हवे काय? आपला बाप अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्यात तो कृतींनी नीतिमान ठरला नव्हता काय? त्याचा विश्वास त्याच्या कृतींत कार्य करत होता, आणि कृतींनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसत नाही काय? ‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर कृतींनी माणूस नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता.