याकोब 2:2-3
याकोब 2:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.”
याकोब 2:2-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एखादा मनुष्य तुमच्या सभांमध्ये सोन्याची अंगठी घातलेला आणि उंची कपडे परिधान केलेला आला, व एक गरीब मनुष्य जुने आणि मळीन कपडे घातलेला आला. तर तुम्ही ज्याने उंची कपडे परिधान केले आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देता आणि म्हणता, “ही जागा तुमच्यासाठी चांगली आहे,” परंतु त्या गरीब मनुष्याला म्हणता, “तिथे उभा राहा” किंवा “माझ्या पायाजवळ जमिनीवर बस,”
याकोब 2:2-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला; आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा;” आणि दरिद्र्याला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस;”
याकोब 2:2-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सोन्याची अंगठी घालून व भपकेबाज कपडे परिधान करून एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि अस्वच्छ कपडे घातलेला एक गरीब माणूस आला असता तुम्ही भपकेबाज कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पायांशी बस.”