मजकुराकडे जा

याकोब 2:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

याकोब 2:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला

याकोब 2 MARVBSI

याकोब 2:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला

याकोब 2 IRVMAR

याकोब 2:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

सोन्याची अंगठी घालून व भपकेबाज कपडे परिधान करून एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि अस्वच्छ कपडे घातलेला एक गरीब माणूस आला असता

याकोब 2 MACLBSI

याकोब 2:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एखादा मनुष्य तुमच्या सभांमध्ये सोन्याची अंगठी घातलेला आणि उंची कपडे परिधान केलेला आला, व एक गरीब मनुष्य जुने आणि मळीन कपडे घातलेला आला.

याकोब 2 MRCV