याकोब 2:13-17
याकोब 2:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते. माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
याकोब 2:13-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते. माझ्या बंधू आणि भगिनींनो, जर कोणी असा दावा करतो की त्याच्याजवळ विश्वास आहे, परंतु क्रिया नाही तर त्यापासून काय लाभ? अशा विश्वासाने त्यांचे तारण होऊ शकेल का? समजा तुमच्या बंधू किंवा भगिनीला वस्त्र आणि रोजच्या अन्नाची उणीव आहे. जर तुमच्यापैकी एकजण त्यांना म्हणतो, “शांतीने जा; ऊब घ्या व खाऊन तृप्त व्हा,” परंतु त्यांच्या शारीरिक गरजासंबंधी काही करीत नाही, तर काय उपयोग? त्याचप्रमाणे, विश्वासाला जर कृतीची जोड नसली तर तो निर्जीव आहे.
याकोब 2:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते. माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा;” पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.
याकोब 2:13-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण ज्याने दया केली नाही, त्याचा न्याय परमेश्वर दयेवाचून करील; परंतु दया न्यायावर विजय मिळवते. माझ्या बंधूंनो, मी विश्वास ठेवतो, असे कोणी म्हणत असून तो कृती करीत नाही, तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याचे तारण करायला समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, ‘सुखी राहा, कपड्यालत्याकडे व खाण्यापिण्याकडे लक्ष द्या’, पण जीवनावश्यक गोष्टी त्यांना तुम्ही देत नाही, तर त्याचा काय फायदा? म्हणजेच विश्वासाला अनुसरून जर कृती केली नाही, तर तो जात्या निर्जीव आहे.