YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 66:7-11

यशया 66:7-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“तिला कळा येण्यापुर्वीच ती प्रसूत झाली, तिला वेदना लागण्याच्या आधीच तिला पुरुषसंतान झाले.” अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का? कारण सियोन प्रसूतिवेदना पावली तेव्हाच ती आपली मुले प्रसवली. परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय? जो मी जन्मास आणतो तो मी गर्भस्थान बंद करीन काय? तुमचा देव असे म्हणतो. यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा. कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे.

सामायिक करा
यशया 66 वाचा

यशया 66:7-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच तिची प्रसूती होईल; वेणा येण्यापूर्वीच ती पुत्र प्रसवेल. असे झालेले कोणी कधी ऐकले आहे का? असे कोणी कधी पाहिले आहे का? एका दिवसात एखादे राष्ट्र जन्मास येते किंवा एका क्षणात एखादे राष्ट्र उत्पन्न होते? तरी देखील सीयोनाच्या प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच ती तिच्या संततीस जन्म देते. जन्म देण्याच्या क्षणापर्यंत आणल्यावर, मी प्रसूत करणार नाही काय?” असे याहवेह म्हणतात. “प्रसूतीस आणल्यावर मी उदर बंद करतो काय?” असे परमेश्वर म्हणतात. “यरुशलेमवर प्रीती करणार्‍यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्‍या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा. कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.”

सामायिक करा
यशया 66 वाचा

यशया 66:7-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

वेणा येण्यापूर्वीच ती प्रसूत झाली, वेदना होण्यापूर्वीच तिला पुत्र झाला. अशी गोष्ट कोणी कधी ऐकली काय? अशी गोष्ट कोणी पाहिली काय? देश एका दिवसात जन्म पावतो काय? राष्ट्र एका क्षणात जन्मास येते काय? परंतु सीयोनेने वेणा दिल्या, ती आपली मुले प्रसवली. मुले जन्माच्या लागास आणून त्यांना मी प्रसवणार नाही काय? असे परमेश्वर म्हणतो. जो मी जन्मास आणतो तो मी गर्भाशय बंद करीन काय? असे तुझा देव म्हणतो. यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा; म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल व तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल.”

सामायिक करा
यशया 66 वाचा