यशया 66:19-20 - Compare All Versions
यशया 66:19-20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील. आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.
यशया 66:19-20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील. आणि सर्व राष्ट्रातून, तुमच्या सर्व लोकांना ते यरुशलेममधील माझ्या पवित्र पर्वतावर—घोड्यांवरून, रथातून, डोल्यांतून, खेचरांवरून व उंटावरून याहवेहसाठी अर्पण म्हणून आणतील,” असे याहवेह म्हणतात. “इस्राएल लोक ज्याप्रमाणे अन्नार्पण करतात त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात विधिपूर्वक शुद्ध पात्रात आणतील.
यशया 66:19-20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.