यशया 65:17-18
यशया 65:17-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार, आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही. पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरूशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन.
यशया 65:17-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कारण पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही. परंतु मी जी निर्मिती करेन त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा. कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.
यशया 65:17-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो.