यशया 56:5-6
यशया 56:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही. जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात
यशया 56:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही. आणि जे विदेशी याहवेहशी एकनिष्ठ राहतात, जे त्यांची सेवा करतात, त्यांच्या नावावर प्रीती करतात, आणि त्यांचे सेवक झाले आहेत, जे सर्व त्यांच्या शब्बाथास अपवित्र न करता त्याचे पालन करतात, आणि माझा करार दृढ धरून राहतात
यशया 56:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही. तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात