यशया 54:1-2 - Compare All Versions
यशया 54:1-2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मूल न झालेल्या वंध्ये, आनंदाने गजर कर; ज्या तुला प्रसूतिवेदना माहीत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार; कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेर्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नकोस; आपल्या दोर्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक.
यशया 54:1-2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर. कारण परमेश्वर म्हणतो, ‘विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा एकाकी असणाऱ्याची मुले अधिक आहेत.’” तू आपला तंबू मोठा कर आणि तंबूचे पडदे अधिक दूर बाहेर पसरण्याचे थांबू नको; आपल्या दोऱ्या लांब कर आणि आपल्या मेखा मजबूत कर.
यशया 54:1-2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,” असे याहवेह म्हणतात. “आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.