YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 50:6-7 - Compare All Versions

यशया 50:6-7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मी मारणार्‍यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्‍यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.

सामायिक करा
यशया 50 MARVBSI

यशया 50:6-7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील. म्हणून मी माझे तोंड गारगोटीसारखे केले, कारण मला माहीत आहे माझी फजिती होणार नाही.

सामायिक करा
यशया 50 IRVMAR

यशया 50:6-7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही. मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.

सामायिक करा
यशया 50 MRCV