यशया 49:8-9
यशया 49:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन. देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला, तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रकट करा. ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील.
यशया 49:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह असे म्हणतात: “माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन, आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन; मी तुमचे संगोपन करेन आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून, तुमची भूमी पुनर्स्थापित होईल, आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील, बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’
यशया 49:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो. तू बंदीत असलेल्यांना म्हणावे, ‘बाहेर या;’ अंधारात आहेत त्यांना म्हणावे ‘उजेडात या.’ ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल.