YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 45:5-6 - Compare All Versions

यशया 45:5-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही. जरीही तू मला ओळखत नव्हतास, तरीही तुला युद्धास सशस्त्र केले. अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही. मी परमेश्वर आहे, आणि दुसरा कोणीही नाही.

सामायिक करा
यशया 45 IRVMAR

यशया 45:5-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही; माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही. तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही, तरी मी तुला सामर्थ्य देईन. मग सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच. मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही

सामायिक करा
यशया 45 MRCV

यशया 45:5-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही.

सामायिक करा
यशया 45 MARVBSI