YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 43:10-12 - Compare All Versions

यशया 43:10-12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे, अशासाठी की, तुम्ही जाणावे व माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मीच तो आहे हे समजावे. माझ्या आधी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही. मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही. मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
यशया 43 IRVMAR

यशया 43:10-12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु याहवेह घोषित करतात, “हे इस्राएला, तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि तुम्ही माझे निवडलेले सेवक आहात. जेणेकरून तुम्ही ओळखावे आणि माझ्यावर विश्वास ठेवावा, मीच परमेश्वर आहे हे समजून घ्यावे. माझ्यापूर्वी दुसरा कोणी देव अस्तित्वात नव्हता, आणि माझ्या नंतरही नसेल. मी, केवळ मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले— मीच केले, तुमच्यातील इतर कोणत्याही विदेशी दैवताने केले नाही.” याहवेह घोषित करतात, तुम्ही माझे साक्षीदार आहात की, “मीच परमेश्वर आहे.

सामायिक करा
यशया 43 MRCV

यशया 43:10-12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजावले; तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता; म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे” असे परमेश्वर म्हणतो.

सामायिक करा
यशया 43 MARVBSI