यशया 40:3-4
यशया 40:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
घोषणा करणाऱ्याची वाणी म्हणते, अरण्यात परमेश्वराचा मार्ग तयार करा; आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक दरी उंच होईल, आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट होईल; आणि खडबडीत जमीन सपाट होईल आणि उंचसखल जागा मैदान होईल.
सामायिक करा
यशया 40 वाचायशया 40:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बोलविणार्याचा आवाज म्हणतो: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली याहवेहसाठी मार्ग तयार करा; आणि आमच्या परमेश्वरासाठी वाळवंटामध्ये महामार्ग सरळ करा, प्रत्येक दरी उंच केली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल; खडबडीत जमीन सपाट होईल, खडकाळ जागा सखल भूप्रदेश करण्यात येईल.
सामायिक करा
यशया 40 वाचायशया 40:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
घोषणा करणार्याची वाणी ऐकू येते की, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो
सामायिक करा
यशया 40 वाचा

