YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 40:26-31

यशया 40:26-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आकाशाकडे वर पाहा! हे सर्व तारे कोणी निर्माण केले आहेत? तो त्याच्या निर्मीतीचे मार्गदर्शन करून बाहेर नेतो आणि त्या सर्वांना नावाने बोलावतो. त्याच्या सामर्थ्याच्या महानतेमुळे आणि प्रबळ सत्ताधीश आहे म्हणून, त्यातला एकही उणा नाही. हे याकोबा, तू असे का म्हणतोस, आणि इस्राएलास जाहीर करतोस, माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत आणि माझा देव माझ्या समर्थनाविषयी लक्ष देत नाही? तुला माहीत नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, पृथ्वीच्या सीमा निर्माण करणारा, थकत किंवा दमत नाही; त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही. तो थकलेल्यांना शक्ती देतो; आणि निर्बलांस नवचैतन्य देऊन ताकद देतो. तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात. पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.

सामायिक करा
यशया 40 वाचा

यशया 40:26-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुमची दृष्टी वर करा व आकाशाकडे पाहा: हे सर्व कोणी निर्माण केले आहे? एकामागून एक असे हे तारांगण कोणी अस्तित्वात आणले आहे, आणि त्यातील प्रत्येकाला ते नावाने हाक मारतात. त्यांच्या थोर सामर्थ्यामुळे व त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे त्यातील एकही कधी हरवत नाही. हे याकोबा, तू अशी तक्रार का करतो? हे इस्राएला, असे तू कसे म्हणतोस, “याहवेहपासून माझे मार्ग लपलेले आहेत; माझे परमेश्वर माझ्या संकटाकडे दुर्लक्ष का करतात”? तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही ते कधी ऐकले नाही काय? याहवेहच सनातन परमेश्वर आहेत, पृथ्वीच्या दिगंताचे उत्पन्नकर्ता तेच आहेत. ते कधी थकणार वा कंटाळणार नाहीत, त्यांची आकलन शक्ती अगम्य आहे. थकलेल्यास ते शक्ती देतात आणि बलहीनाचे सामर्थ्य वाढवितात. तरुण थकतात व कंटाळतात, तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात; पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.

सामायिक करा
यशया 40 वाचा

यशया 40:26-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही. हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की, “माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे?” तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.

सामायिक करा
यशया 40 वाचा